मेघ दुरोळी
विषय --तुज पाहता साजणी ...
वर्ण -- 11
विषय --तुज पाहता साजणी ...
वर्ण -- 11
तुज पाहता सहज साजणी
वेड लागले तुझे या लोचनी
वेड लागले तुझे या लोचनी
वाटे रुप ते साठवावे ध्यानी
हाच छंद जडला माझ्या मनी.
हाच छंद जडला माझ्या मनी.
काय म्हणू मी माझ्या या वेडाला
कसे समजावू मम मनाला
कसे समजावू मम मनाला
येता क्षणिक दृष्टी समोरूनी
मन सुखावते तुला पाहूनी
समजेना अजूनी माझे मला
कसे सांगू मनीचे भाव तुला
कसे सांगू मनीचे भाव तुला
.....वैशाली वर्तक..15/10/2019
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा