मन उधाण वा-याचे......
देवाने माणसाला मेंदू बहाल केल्याने फारच मोठी देणगी दिली .त्यात त्याला विचार शक्ती दिली .त्यामुळे मन ही अद्भुत शक्ती प्राप्त झाली. हे मन दिसत नाही पण सदा विचार करत असते .व माणसास सर्व कर्मे करण्यास प्रवृत्त करते.
हे मन कुठे वसते .त्याच्या हृदयी. मेंदूच्या ताब्यात .अतिशय चंचल ..म्हणून तर त्यास उधाण वा-याची उपमा देतात. फूलपाखरा प्रमाणे अतिशय चंचल ..क्षणात ईकडे तर क्षणार्धात दुसरी कडे विचारात रमते. बसल्या जागी जग फिरुन येते. आता तर आवकाश फिरुन येते म्हणता येईल.
क्षणा क्षणाला भरती येणा-या या मनास म्हणून तर सर्वात गतीशील मानतात.
हे मन कधी आनंदी तर कधी दुःखी होते. आनंदाने नाचते ..बहरते ..फूलते.तसेच दुःखाने विवश होते. इतकेच नव्हे तर ईतरांचे दुःख पाहून पण व्याकुळ होते.दुःखी कष्टी होते असे हे मन भावना प्रधान असते.
ह्या मनात नव रस भरलेले आहेत. करुणा, दया ,.हास्य , आनंद, दुःख , आश्चर्य
असे सारे भाव तयात वसलेले आहेत. मनाने ठरविले तर ते मानवास सुखी आनंदी
करु शकते . म्हणूनच म्हणतात ना
" मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे आगर"
ज्या मनात करूणा, दया विचार येतात त्याच मनात दृष्ट भाव पण येतात. म्हणून मन सदा प्रसन्न ठेवावे. तयास ताबूत ठेवण्यास आध्यात्मिक जोड हवी.
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा