मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

चित्र काव्य
















उपक्रम
चित्र काव्य


तेच तेच पान पुन्हा
वाचतेय अनेक वेळा
परि तुझ्या  आठवांनी
कंठ दाटून आला  गळा

जातांना तूच दिलेले फूल
अजूनही जपून ठेवियले
येता  आठवण तुझी
अश्रू  पडूनी  ते ओलावले

माझी व्यथा पाहूनिया
गुलाब पण हिरमुसला
पाकळी पाकळी तयाची
जणु हळुवार कोमेजला

वाचन हे निमित्त मात्र
पान हलत नाही एक
तव आठवात मन
रमते विचारात अनेक.

कधी संपेल  हा काळ
करमेना क्षणभर मला
परतूनी तू ये ना जवळी
हेच सांगणे माझे  तुला

वैशाली वर्तक .,..14/10/20
19



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...