वाटा 1/5/2018
सोडू नको धोपट वाट
मनुजा, सोडू नको धोपट वाट
कशी धावते पहा सरिता
आक्रमिते विकट वाट सर्वथा
सतत वाहते कधी न थांबता
मनुजा सोडू नको धोपट वाट
जपून पाऊले उचल जरा
धैर्य संयम ठेवूनीया मना
दुर्गम वाटच नसे सर्वदा
मनुजा सोडू नको धोपट वाट
बीजांकुर फूटतसे मातीतून
खडतर वाट सहतसे "ते "पण
येई वरती हळूच डोकावून
मनुजा सोडूनको धोपट वाट
सोसून दगड टाकीचे घाव
देवत्व पावोनी शोभे राऊळात
सुगम मार्ग मग मिळे तयास
मनुजा सोडू नको धोपट वाट
पदो-पदी तू रहा खंबीर
कधी न ढळूदे तव विश्वास
विचलीत न होता तू मार्गातून
मनुजा सोडू नको धोपट वाट
देव मानीती राम-कृष्णास
तयांनाही न चुकला कारा-वास
प्रभूरामांनी भोगियला वनवास
मनुजा सोडू नको धोपट वाट
........ .............. वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा