अरे अरे ज्ञाना झालासी पावन
मिळविता जीवनी परमानुभव
दूर करिता जाहलासी प्रपंचास
प्राप्त जाहले तया क्षमाशील रुप
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
उमजले देव वसे चराचरात
असे तो अपुल्याच हरकर्मात
अनुभुती ही जाहली तयास
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
आपपर भावातूनी होई मुक्त
मी पण गेले सर्वस्वी विरून
अन्य तत्वाचा न राहे संदेह
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
भौतिक सुखा होऊनी विन्मुख
जाहला मिळविता अलौकिक सुख
पावली समाधान वृत्ती तयास
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
वैशाली वर्तक 20/5/2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा