पानावरील दव बिंदू
पानावरचा दव बिंदू
भासत होता मोती समान
काय करता येईल तयातून
विचार आले अनेक मनात .
भासत होता पा-यासम ,
भरून घ्यावा नळीत तयास,
अन बनवावे ताप - मापक ,
मुलांना देण्या ज्ञान अगाध .
शिक्षकी , विचार आला मनात .
बघत होता थेंबाकडे ,
टकमक लावुनिया डोळे ,
शमवेल आता तृष्णा माझी ,
सरसावत तो आला पुढे .,
कुणीएक , पक्षी चातक ..
कुणी सराफ मनी वदला ,
मन:शांती साठी हाच हवा ,
स्पर्श तयाचा होई कांतीला
मोत्याची बनवू करांगुलीला .
चंद्रबळा साठी , हाच बरा
पाहूनी त्या दव बिंदूस
कुणी भक्त होऊनी आकृष्ट ,
मनीं आला विचार तयास
मस्तकींच्या मयूर पिसास .
शोभिवंत , मम् कान्हयांस .
जवळ जाऊनी होते निरखत ,
शोभेल कीं , अपुल्या अंगठीत?
का, अडकवून द्यावा गळसरेत ?
विचार आला मम हृदयात .
अन हळूच , लाविला हात तयास
निसटला की हो पानावरुनी ,
निखळावा मोती धाग्यातुनी ,
गेले विचार क्षणात विखरूनी ,
घरंगळले मनाच्या ओंजळींतुनी .
पानावरील दव बिंदू
भासत होता मोती सम.
पानावरचा दव बिंदू
भासत होता मोती समान
काय करता येईल तयातून
विचार आले अनेक मनात .
भासत होता पा-यासम ,
भरून घ्यावा नळीत तयास,
अन बनवावे ताप - मापक ,
मुलांना देण्या ज्ञान अगाध .
शिक्षकी , विचार आला मनात .
बघत होता थेंबाकडे ,
टकमक लावुनिया डोळे ,
शमवेल आता तृष्णा माझी ,
सरसावत तो आला पुढे .,
कुणीएक , पक्षी चातक ..
कुणी सराफ मनी वदला ,
मन:शांती साठी हाच हवा ,
स्पर्श तयाचा होई कांतीला
मोत्याची बनवू करांगुलीला .
चंद्रबळा साठी , हाच बरा
पाहूनी त्या दव बिंदूस
कुणी भक्त होऊनी आकृष्ट ,
मनीं आला विचार तयास
मस्तकींच्या मयूर पिसास .
शोभिवंत , मम् कान्हयांस .
जवळ जाऊनी होते निरखत ,
शोभेल कीं , अपुल्या अंगठीत?
का, अडकवून द्यावा गळसरेत ?
विचार आला मम हृदयात .
अन हळूच , लाविला हात तयास
निसटला की हो पानावरुनी ,
निखळावा मोती धाग्यातुनी ,
गेले विचार क्षणात विखरूनी ,
घरंगळले मनाच्या ओंजळींतुनी .
पानावरील दव बिंदू
भासत होता मोती सम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा