निवांत
सुख, शांति अन् आनंद ,
मिळविण्या धावे मानव जन्मभर .
परि असती हे तयाच्याच मनांत ,
जीवन चाले भरघाव गतिने,
निवांत क्षण तयाते न मिळे .
तगमग होतसे जीवास फार ,
परि शोघिती जीवनात निवांत.
मानसिक एक तृष्णा निवांत
निवांत शोधिती पशू अन् विहंग
मजेत टिपती वा विहरती नभातून
रवंथ करिती गुरे निवांतात
कसा मिळतो तयांना निवांत
मानसिक एक तृष्णा निवांत .
मानसिक एक तृष्णा निवांत .
शमवून अपुल्या तप्त किरणांना ,
रवि जातसे अस्त चलाला.
जणू अवनीच्या कुशीत लपून ,
शोधितो तो पण निवांत .
मानसिक एक तृष्णा निवांत .
धिक्कार असो असल्या जिण्याचा ,
असे, चिंता भवतापच नुसता .
न मिळती क्षण निवांताचे ,
ते कसले जीणे निरर्थकाचे ?
मानसिक एक तृष्णा निवांत .
मानसिक एक तृष्णा निवांत .
मिळवावा लागतो क्षण निवांत ,
बदल पहाया सृष्टीचे नित नव .
मेघांचे बदलते रंग नभाते,
मग सुचते गीत निवान्ताचे .
मानसिक एक तृष्णा निवांत.
DBAसाहित्यिक गडचिरोली
आयोजित उपक्रम
विषय .. क्षण एकांताचे
शीर्षक...मानसिक तृष्णा निवांत.
सुख, शांति अन् आनंद ,
मिळविण्या धावे मानव
परि असती ते तयाच्या मनांत ,
तशीच असे तृष्णा निवांत .
जीवन चाले भरघाव गतिने,
क्षण तया'ते न मिळे निवांत
तगमग होतसे जीवास फार ,
परि शोघिती जीवनात एकांत
निवांत शोधिती पशू अन् विहंग
मजेत टिपती वा विहरती नभात
रवंथ करिती गुरे निवांतात
कसा मिळतो तयांना निवांत
शमवून अपुल्या तप्त किरणांना
रवि जातसे अस्त चलाला
जणू अवनीच्या कुशीत लपून
शोधितो तो पण निवांताला .
धिक्कार असो असल्या जिण्याचा ,
न मिळती क्षण निवांताचे ,
असे, चिंता भवतापच नुसता
ते कसले जीणे निरर्थकाचे ?
मिळवावा लागतो क्षण निवांत ,
बदल पहाया सृष्टीचे नव नीत
थज मेघांचे बदलते रंग नभाते,
मग सुचते निवान्ताचे गीत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
साकव्य काव्य स्पर्धा 26
स्पर्धेसाठी
विषय ... निवांत
शांत शांत अगदी निशांत
क्षण फिरुनी यावे निवांत
सुख, शांति अन् आनंद ,
मिळविण्याचा असे छंद
सारे वसती आपुल्याच मनात
क्षण फिरुनी यावे निवांत. 1
मन शोधी सदैव शांती
जीवाला न कदापि भ्रांती
वाटे मनाला हवा एकांत
क्षण फिरुनी यावे निवांत 2
मजेत विहरती पहा विहंग
गुरे निवांतात करीती रवंथ
कसा मिळतो क्षण तया शांत
क्षण फिरुनी यावे निवांत. 3
.
तप्त किरणांना शमवून
जातो धरेच्या कुशीत लपून
येतो गगनी शशीकांत
क्षण फिरुनी यावे निवांत. 4
वैशाली वर्तक
अहमदाबाद. १\८\२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा