माहेर
माहेर शब्द म्हटला की माया ,जिव्हाळा ,प्रेम, ममता ,स्नेह ,ओलावा ,आत्मीयता ,सहृदयता ,विश्वास, हमी वगैरे सर्व भावना कशा उचंबळून येतात .कारण माहेरातून ह्या सर्व भावनांची नदी ,जणू काही दुथडी भरून वहात असते.काळजाचाच तुकडा तो . तेव्हा ह्या सर्व भावना माहेरातून मिळणारच . जेथे प्रेमाने , लाडाने गोंजारून हट्ट पुरविलेले असतात .व लहानाचे मोठे केलेले असते . मोठेपणाकडे आणलेली ती पाऊलवाट असते . अशा या माहेराच्या खुणा, आठवणी आजीवन मनात जिवंत असतात .दिवस रात्र एक करून , डोळ्यात तेल घालून काळजीपूर्वक प्रेमाने वाढविणारी ,जिवापार प्रेम करणारी ,तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारी , योग्य तिथे धाक शिस्तता पाळण्यास लावणारी माणसे असतात.मातीच्या गोळ्याला कुंभार जसे आकार देऊन सुंदर मडकी बनवितो,शिल्पकार आकारहीन दगडातून सुंदर शिल्प तयार करतो .तसे ह्या मानवी निरागस, निर्मल मनावर उत्तम संस्कार, प्रेम,विनयता,,दया,सहनशीलता, हुशारी, चालाखी वगैरे गुणांची जडण घडण करणारे शिल्पकार म्हणजे आई वडील व वडील मंडळी प्रत्येक स्त्रीच्या माहेरात असतात . त्या माहेरतून मिळविलेल्या गुणांचा व घडविणा-या जनांचा अथवा व्यक्तिंचा प्रत्येक स्त्रिला आदर अभिमान , गौरव तिच्या मनात सतत असतो. म्हणूनच तर माहेर शब्द निघताच स्त्रीचे कान टवकारतात. माहेरची कोणी व्यक्ति आली की मन माहेरच्या गोष्टी ऐकण्यास आतुरते .
कन्या मोठी होते व पतिगृही सासरी येते. माहेर व सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते . सासरी येऊन
सासरच्या मंडळीना आपलेसे करते ,सासरच्या मंडळीत रमते .तेथील रिती , रिवाज ,पध्दती अंगिकारते .व तसे करतांना माहेरच्या काही रीतींना तिला मुरड पण घालावी लागते .तसे करत करत ती पतीगृही रममाण होते .व आपल्या लेकी साठी "माहेर"चे झाड रुजवते .लावते. ही आपल्या संस्कृतीत चालत आलेली परंपरा आपल्या समाज रचनेत च रूढ झालेली आहे .
तेव्हा प्रत्येक स्त्रिला माहेर प्रियच असते .व ते असणारच हे स्वाभाविकच आहे . स्त्री वयाने कितीही मोठी झाली तरी तिचे माहेरच्या आठवणीने मन गहिवरते .त्या आठवणीत मन रमते.नुसत्या आठवणीने मन सुखावते.आनंदते. म्हणूनच तर कवी देखील स्त्रीच्या मनातील माहेरा बद्दलचे विचार , कवी कल्पनेतून रंगवितात. जसे की,"वा-या कडून तू माहेरास जा व मी येथे सुखात आहे असा संदेश पवनास देण्यास व माहेरची खुशाली घेऊन येण्यास व तेथील जुई अजून तशीच बहरत आहे ना? त्या जुईचा सुगंध पवना तू माझ्या पर्यंत आण. दमून भागून आलेल्या आई बाबांना माझी खुशाली दे.व झोपाळ्यावर बसलेल्या आजीच्या कुशीत जाऊन माझा खुशालीचा निरोप दे "अशा विचाराने स्त्रीचे मन तिच्या माहेरात कसे भरकटत असते ते कवींनी पण साहित्यात रंगविले आहे.पुढे काळाच्या गतिप्रमाणे माहेरचे छ्त्र जरी हरपले तरी मन मात्र मागे वळून माहेरच्या आठवणीत जगते .
तेव्हा जेथे ओलावा प्रेम ते माहेर . अशी सर्व सामान्य स्त्रीची माहेरची कल्पना असते .पण माहेर फक्त स्त्रीयांनाच असते असे नव्हे .तर जिथे जीवाला आनंद ,सुख ,समाधान मिळते ,जेथे विश्वास श्रद्धा आशा असते व ज्या ठिकाणी आपण आपले मन मोकळे करू शकतो असे ठिकाण ते माहेर . त्यामुळेच तर भक्तिमार्गात माहेर या शब्दास खूप महत्व आहे. संत लोकांना देव हेच मायबाप वाटतात . अर्थात ,प्रत्येकासाठी ते खरेच आहे .कारण तोच तारक,तोच विश्वंभर . विश्वाचा भार वाहून नेणारा आहे.त्यामुळे संत लोकांनी तर भक्तिरसात विठोबास तुच माझी माता पिता, तसेच देवाजीच्या दारी, देवाच्या पायी ,विठोबाच्या व्दारी माझे माहेर आहे . व तेथेच त्यांना परमआनंद प्राप्त झाला .म्हणूनच संतानी भक्तीत विठोबाला लेकुरवाळा पण संबोधले आहे. संत मंडळी त्याची लेकरे आहेत . जसे की गोराकुंभार मांडीवर आहे ,चोखामेळा बरोबर आहे जनाबाई मागे उभी आहे .असे विठोबाचे चित्र भक्तिरसात वर्णिले आहे.कारण ही सर्व मंडळी विठोबाच्या नामस्मरणात, त्यांच्याशी एकरूप होण्यात, माहेरचा विसावा मिळाल्याचा आनंद मानतात .म्हणूनच तर जनार्दन स्वामी म्हणतात ,"माझे माहेर पंढरी ,आहे भिवरेच्या तीरी " तेव्हा भक्तिरसात माहेरची अशी कल्पना आहे .
आता काळ बदलला आहे मुली शिक्षीत झाल्या आहेत नुसत्याच शिक्षीत नव्हे तर शिक्षणाच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या पण सबळ झाल्या आहेत.त्यामुळे त्यांना स्वत:ला वैचारिक स्वातंत्र्य तसेच आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे आणि विज्ञानाने जग अगदी जवळ आले आहे त्यामुळे माहेर पण जवळ झाली आहेत. आता कवी कल्पनेतून वा-याकडून माहेरास संदेश पाठविण्यात मन रमविण्याची गरज भासत नाही तर सरळ फोन उचलून तसेच वेब कॅमेरा व्दारे क्षणात माहेरचा आवाजच नाही तर सचित्र माहेरात जाऊन पोहचता येत आहे.
तसेच नौकरी निमित्य वेगळ्या गावात सासर थाटावे लागल्याने अथवा स्वतंत्र कुटुंबात रहात असल्याने म्हणजे एकत्र कुटुंब नसल्याने मुलींना स्वतंत्र कुटुंबात घराची जवाबदारी एकटीलाच
उचलावी लागते व त्याच बरोबर व्यक्ति स्वातंत्र्य मिळत असल्याने जवाबदारी व स्वतंत्रता यात गुंतल्याने माहेरची ओढ जरी भासत असली , माहेर जरी सदा प्रियच असले तरी पण जवाबदारी तिला मोठी बनविते .तसेच मुलींचे आई वडिल मुलीचे भवितव्य लग्ना आधी घडविण्यात जागरूक असतातच पण आता सुनेचे भवितव्य सांभाळण्यात सासरची मंडळी पण तितकीच जागरूक झालेली आहेत . तेवढेच नव्हे तर मुलीची आई पण मुलीच्या घरी म्हणजे मुलीच्या सासरी जाऊन माहेरची बरसात करून भवितव्य सांभाळण्यात मदतरूप होत आहेत .त्यामुळे ख-या अर्थाने माहेर सासर एक झालेले आहे . त्यामुळे
उचलावी लागते व त्याच बरोबर व्यक्ति स्वातंत्र्य मिळत असल्याने जवाबदारी व स्वतंत्रता यात गुंतल्याने माहेरची ओढ जरी भासत असली , माहेर जरी सदा प्रियच असले तरी पण जवाबदारी तिला मोठी बनविते .तसेच मुलींचे आई वडिल मुलीचे भवितव्य लग्ना आधी घडविण्यात जागरूक असतातच पण आता सुनेचे भवितव्य सांभाळण्यात सासरची मंडळी पण तितकीच जागरूक झालेली आहेत . तेवढेच नव्हे तर मुलीची आई पण मुलीच्या घरी म्हणजे मुलीच्या सासरी जाऊन माहेरची बरसात करून भवितव्य सांभाळण्यात मदतरूप होत आहेत .त्यामुळे ख-या अर्थाने माहेर सासर एक झालेले आहे . त्यामुळे
कृष्णा मिळाली कोयनेला
तसाच माझा माहेर बाई
येऊन मिळाल सासरला
या गाण्याच्या ओळी ख-या अर्थाने प्रत्यक्षात उतरत आहेत .व माहेर सासर असा भेद राहिला नाही.हे सारे
वैचारिक प्रल्गभतेने होत आहे .व चांगलेच आहे.
वैचारिक प्रल्गभतेने होत आहे .व चांगलेच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा