पण सांगावयाचे राहूनच गेले !
निर्मला खूप बोलकी अगदी अवखळ वहात्या झ-या सारखी बोलणारी .एकदा बोलू लागली की
तिला काय सांगू किती बोलू असे व्हायचे .अशी बोलक्या स्वभावाची वा बडबडी .तिच्या समोरच्या व्यक्तीला नेहमी श्रोताच व्हावे लागते .
सहज एकदा, एकदा कसले? तिचे असे अनेकदा होते .मैत्रिणीला वाढदिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास फोन केला .फोन उचलला.झाsss ले ! "काय ग काय म्हणतेस?बरेच दिवसात फोन नाही .नुसती म्हणतेस की तुझी आठवण येते. पण कधी फोन करत नाहीस, का कधी येत नाहीस, कोठे भेटू म्हंटले तरी नाही असे उत्तर असते ," असे म्हणत तिने जे भाष्य (बोलणे) सुरु केले की , तिच्या सर्व मैत्रिणी, त्यांच्या सासू , त्यांच्या नातवंडांच्या. इव्हन शेजार पाजा-यांच्याबद्दल गप्पा झाल्या पण फोन ज्या कारणाने होता त्या बद्दल विषयच नाही .आणि मग गप्पा मारून फोन ठेवला थोड्या वेळानंतर लक्षात आले की,अग बाई ! मी तिला फोन वाढ दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास केला होता . आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले ! मग काय पुन्हा पुन्हा फोन लावला पण मग मात्र तिचा फोन सतत एंगेज येत होता. कारण तिच्या सारखे तिच्या मैत्रिणीचे बरेच well wishers होते ना.
कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो, ती 'झी मराठी" वरची " कुंकुं" सिरीअल होती तिच्यात नाही का ? जानकीला तिच्या नव-यास खूप काही सांगायचं असते , सांगणे सुरुवात करे पर्यंत वेळ जातो .तिच्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला पैशांची गरज आहे. हे ती नव-यास कधी ची सांगण्याचा
प्रयन्त करावयाची ,पण दर वेळी काही कारणाने सांगावयाचे राहून जावयाचे असो, हो ! पण त्यामुळेच तर सिरीअल लांबते ना ?.व आपणास मनोरंजन मिळते .तेव्हा अशा व्यक्ति समाजात असतात की मूळ मुद्यावर येता येत नाही .मग मनात हूर हूर करत बसतात
प्रयन्त करावयाची ,पण दर वेळी काही कारणाने सांगावयाचे राहून जावयाचे असो, हो ! पण त्यामुळेच तर सिरीअल लांबते ना ?.व आपणास मनोरंजन मिळते .तेव्हा अशा व्यक्ति समाजात असतात की मूळ मुद्यावर येता येत नाही .मग मनात हूर हूर करत बसतात
तशीच एक वेडी प्रेयसी . प्रेमात वेडी झालेली म्हणून वेडी बर का ! . प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करावयाची , पण रोजच सांगावयाचे राहून जायचे. घरी येऊन मनाशी म्हणायची , इश्य बाई ! आज पण नाही जमले. सांगायचे राहूनच गेले .प्रियकर गावीं जाण्यास निघाला ती स्टेशनवर सोडावयास गेली .तेथे आता तरी पटकन बोलावे ना ! पण छे ,शेवटीं गाडीची सुटण्याची वेळ झाली सिग्नल मिळाला ,गाडी हलणार शेवटी हातवारे करून डम शो मध्ये करतात ना तसे करून I love you दाखविले . ठीक झाले .प्रियकरास भावना तरी पोहचल्या .तो म्हणाला हा! हा! भा. पो म्हणून ठीक झाले. तेव्हा पण तोंडाने सांगावयाचे राहूनच गेले !
आपण मंदिरात जातो. तेथे पण असेच होते .देवाजवळ काय काय मागावयाचे ते नक्की करतो. हो! देवच तर हक्काचा आहेना ! ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व कुणास पण न ऐकू येवू देता मनातील इच्छा प्रगट करू शकतो .पण भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून देवाजवळ मागावयास जावे तेवढ्यात " ए चला पुढे व्हा ,गर्दी करू नका म्हणून पुजारी ओरडतो. व देवा जवळ पण सांगावयाचे राहूनच जाते .
असो माझ्या सारख्या बाकीच्या मंडळींना सांगते, तुम्हास पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या. पटपट लिखाण करा .नाही तर मग मनात हूर हूर राहील की पण........ सांगावयाचे( लिहावयाचे ) राहूनच गेले
असो माझ्या सारख्या बाकीच्या मंडळींना सांगते, तुम्हास पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या. पटपट लिखाण करा .नाही तर मग मनात हूर हूर राहील की पण........ सांगावयाचे( लिहावयाचे ) राहूनच गेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा