वृत्त. लवंगलता
मात्रा ८-८-८-४
विषय ..माझा गाव
रम्य निसर्गी आवडे मला रहावया मज गावी
निसर्गच पहा क्षणाक्षणाला रूप तयाचे दावी
नदीच्या तटी छोटी छोटी टुमदार घरे वसली
साधे भोळे जन आनंदी चिंता नाही कसली
रोज सकाळी पारावरती विचार विनिमय चाले
कधी न चुकता भेटीगाठी अंगवळीचे झाले
संध्याकाळी भक्ती भावे जन मंदीरी जमती
आनंदाने भक्ती भजनी मजेत सारे रमती
गेले होते सहज पहाण्या, आहे का ते तसेच
जाता गावी, पाहूनिया मी, चकित जाहले लगेच,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा