कल्पतरू जागतिक साहित्य मंच
उपक्रम
विषय.. मर्मबंध
भेट आपली आठवे
जपलीय ती अंतरी
नाते जुळले मनाचे
नाव वसले सदा ची अधरी
आठवांची उजळणी
होते कधी निवांतात
मर्मबंध जुळलेले
येती सहज आठवात
सुख दुःखात दिधली
साथ सदा मिसळून
संसारात आनंदाने
हात दिधला मिळून
साधे शब्द, नसे उद्वेग
नाही कधी गैरसमज
त्वरित करता उकेल
नुरे वाद विवादाची गरज
समज मनी विचारांची
जुळवून घेणे काळाशी
या सा-याच गोष्टींची
सांगड घातली मनाशी
मग पहा कशी प्रेमळ
जादुई वाटे वाटचाल
सदा निर्मळ आनंदे
करा सर्वत्र हालचाल
हेच जीवनाचे मर्म
जाणियले जयांनी
पहा वाटचाल सुखद
होते सदा ऋणानुबंधाची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा