चित्र काव्य
निसर्ग दर्शन एकाबाजूला
पहा उफाळलेला रत्नाकर
लाटांची ऐकू येई गाज
गर्जत धडकती त्या किनाऱ्यावर
आवडे सर्वा समुद्र किनारा
देई जन-मनास उभारी
लाटांचा अविरत खेळ पहाण्या
किssती जन उभे किनारी
दुसरीकडे भौतिक सुखाची
रांग लागली चारचाकी वहानांची
स्पर्धा लागे पुढे जाण्याची
त्यात भर रहदारीच्या आवाजाची.
बाजूला उभ्या गगन चुंबी
उंचच उंच इमारती
रात्री विजेच्या लखलखाटात
सागराची गाज ऐकती
निसर्ग व आधुनिकता
यांचे घडते येथे दर्शन.
पाहून वाटे सागराला
धन्य ते विश्वंभराचे सृजन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा