शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

स्पर्धेच्या युगात हरवले बालपण

अभामसाप मुंबई प्रदेश 
आयोजित उपक्रम क्रमांक 2094
विषय.   स्पर्धेच्या युगात हरवले बालपण


मूल जन्माला येता येता
घाई करती शिक्षणाची
त्याच्या इच्छेविणा सूरु
पाठशाळा वर्ग लावण्याची


सर्वच क्षेत्रात मिळवावे प्राविण 
न घेती ध्यानी त्याची आवड
ढीगभराचे चाले प्रशिक्षण वर्ग
बालकाला नुरे खेळण्या सवड

चित्र कला ते कराटे वर्ग
चार माणसात उठणे बसणे 
कधी खेळेल मित्रा समवेत 
साधे मिळून मिसळून वागणे

सदा स्पर्धा चाले पदोपदी 
 हिरावून घेतले बालपण
मी -माझे चाले सदासाठी
नसेल गोड आठवांची साठवण

देऊ ज्ञानासंगे संस्कार 
खेळ खेळून सांगिक
कमवेल शरीर सौष्ठव 
होईल विकास सर्वांगिण 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...