नाते हळवे
येता नारळी पौर्णिमा
आठवितो बंधु राया
बांधू धागा विश्वासाचा
बंधुत्वाची वसे माया
श्रावणाच्या पौर्णिमेला
दिन रक्षा बंधनाचा
बांधे बहीण भावास
धागा प्रेम रक्षणाचा
राखी बांधता भावास
जरी असता लहान
उभा राहातो पाठीशी
प्रेम तयाचे महान
सण रक्षाबंधनाला
धाव घेई भावापाशी
त्याच्या प्रेमळ मायेची
नाही तुलना कोणाशी
बहिणीच्या प्रेमापायी
पहा किती करी माया
सय येता माहेराची
आठवितो भाऊराया
कृष्ण भाऊ द्रौपदीचा
पहा कसा तिच्या पाठी
येता प्रसंग कठीण
राही उभा सदासाठी
नाती हळवी अनेक
आपल्याला समाजात
कर्मे करीती प्रेमाने
नात्यांच्या त्या बंधनात
दिनरात्र सीमेवर
असे सैनिक रक्षक.
धागा हळव्या नात्याचा
आहे देशाचा सेवक
सफाईचा कर्मचारी
स्वच्छ राखण्या शहर.
घेतो काळजी जनांची
नाते जपुया सत्वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा