गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

गीत. सजणा सांजवेळी असा....... प्रदीप ला दिलेले पहिले गीत 25/4/20

सजणा सांजवेळी असा
शोधिता प्रीतीला जीव वेडा पिसा


अशा या धुंद दिशा पानोपानी गीत झुले
ह्दयी मोहुनिया गळ्यातून प्रीत फुले
सांगु कुणाला गुज मनीचे
राजसा सांगना धीर राखु (साहु)कसा
                             सजणा सांजवेळी असा

अशी मी रानोवनी वा-यांसंगे भिरभिरते
दिव्यांच्या वाती परी, मनी सदा हुरहूर ते
वाट दिसेना, आसु सरेssना रे
वेळीची धाव रे प्राण जाई असा
                  सजणा सांजवेळी असा
चांदणे मोहरले ,वाटे  ते उन्हा परी
सजली धुंद धरा वाटे भिती ऊरी 
काही कळेना गीत जुळेना रे
पेटता भावना सूर लावू कसा
                 सजणा सांजवेळी असा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...