मोराचा समूह आयोजित
*कुठे शोधु विठुराया*
तुझ्या नाम स्मरणाचा
मना लागलासे छंद
भासे भक्तीतच शक्ती
लाभे आगळा आनंद
सदा तव नाम ओठी
तूची श्वास अंतरीचा
कुठे शोधू विठू राया
ध्यास तुझ्याची भेटीचा
ध्यानी मनी स्वप्नी मज
तूच दिसे सदाकाळ
विठू तुझ्या स्वरुपाने
झाली सुखद सकाळ.
.मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
कुठे शोधु विठूराया
गाते तव गुणगान
नाम स्मरणात असे
अनामिक दृढ शक्ती
नका शोधू विठुराया
करा मनोभावे भक्ती
रूप वसले लोचनी
भासे कृपेची साऊली
युगे अठ्ठावीस ऊभा
माझी विठ्ठल माऊली
येता वारी पंढरीला..
झाली घाई दर्शनाची
पाहियली हरी मूर्ती.
काढा दृष्ट विठ्ठलाची
वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा