भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित
विषय.. जगण्याची धडपड
जीव येताची जन्मास
धडपड जगण्याची
सुरू प्राणी मात्रातून
दिसे ती निरंतराची
मेंदू केलाय बहाल
ईश्वराने मानवाला
देतो नवीन कल्पना
प्रतिदिनी जगण्याला
आयुष्यात धडपड
चालते जीवन भर
म्हणून दिसे प्रगती
जीवनात निरंतर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
रोज नवे आविष्कार
नाही निवांतेचा क्षण
जीव शिणला शिणला
म्हणतसे सदा मन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा