भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव
आयोजित उपक्रम
२५\१\२३
विषय ..विचारांचे झाड
अंकुरावे विचारांचे
झाड मम अंगणात
किती होईल चांगलं
उपयोगी लिखणात
झाडांची तोडातो फुले
तसे खुडेल मी विचार
देता विषय समूही
क्षणात मम कविता तयार
मुलांना हवे झाड खाऊचे
हवा तो खाऊ मिळण्या आशेवर
तसे नको कष्ट विचारांचे
विचार दिसतील झाडावर
असे गंमतीचे विचार
आले माझिया मनात
पण रचली ना कविता
काही तरी विचारात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा