बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

पंचाक्षरी शब्द ... शब्दाविष्कार



शब्द

पंचाक्षरी


शब्दा वाचुनी

साहित्य  नसे 

मनोरंजन

होणार कसे          1


शब्द गुंफता

होते कविता

सदा वहावी

शब्द सरिता         2


जपा शब्दांना

नको ते व्यर्थ 

उचित हवे

तयांचे अर्थ         3


झरता शब्द

मिळते ज्ञान

दूर सारिते

सदा अज्ञान         4

     


स्तुती  करण्या

शब्दची कामी

काम साधण्या 

युक्ती  ती नामी       5


 न लागे पैका 

 गोड शब्दाला

 नका कंजुस

 त्या वचनाला         6


कटु शब्दांनी

मन दुःखते

गोड वाणीने

ते सुखावते               7


उमजे भाव

शब्दांनी असे

नसता शब्द

संवाद कसे             8


वैशाली वर्तक










आजचा शब्द

साहित्यात एकंदर

खेळ असे तो शब्दांचा

पूर येतो कल्पनेला

पसारा तो विचारांचा


शब्द भंडार हवाच

रचताना  काव्यओळी

छंद वृत्त यमक ही

हवे मनी सदाकाळी


गद्य पद्य वांडमयाचे

असं किती ते प्रकार

कोटी करिता शब्दांची

होई साहित्य साकार


जुळवूनी शब्द शब्द

होते तयार लिखाण

असो मग ते गद्य पद्य 

शब्दांचीच असे खाण


मुल्य सर्वदा शब्दांचे

जाणे शब्द शिल्पकार

शब्द ओविता उचित

करी तो शब्दाविष्कार


भाषा नटविण्या हवे

शब्दांवर ते प्रभुत्व

खेळ शब्दांचा मांडता

कळे शब्दांचे महत्व






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...