ओघळ
दि 23-8-23
बालकाचे रडणे पाहून
मातेच्या मनी उठे खळबळ
हुंदके देत देत रडताना
गालावर चे पुसते ओघळ
पापण्यांच्या कडा वर
अडलेला अश्रुंचा ओघळ.
हळुच गालावर घसरता
चेहरा लपविता उडे गोंधळ
निसर्ग निर्मित ओधळ
दिसती सदैव विलोभनीय
कडे कपारीतून वर्षा धारांचे
भासे शुभ्र दुग्ध धारा रमणीय
संपता लग्न सोहळा आनंदात
येता प्रसंग वधू पाठवणी
येती डोळा अश्रूंचे ओघळ
अनावर होती मनी साठवणी
काळ्या मातीला कसून
बळी गाळीतो घामाचे ओघळ
येता दिन सुगीचे शिवारी
भरतो सुख समृद्धीची ओंजळ
सुख दुःख भावनांचे
वाहती जीवनी ओघळ
जीवन असे जणु कविता
शब्दांनी भरते ओंजळ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा