दि.20\8\23
... फुलपाखरू
शीर्षक..*अवखळ मोहक*
भिरभिरते फुलपाखरू
बसले क्षणी फुलावर
अलवार स्पर्शे फुलास
लगेच उडाले दुजावर. 1
रंग तयांचे किती सुंदर
जणु पाकळ्याच मोहक
कोणते पाखरु ?, कुठलं फुल?
दोघेही चित्ताला वेधक. 2
करी हितगुज फुलांशी
थांबण्या नसे वेळ पळभरी
झुळूके सरशी फुल डौलता
उडून गेले की क्षणभरी 3
किती प्रकार किती जाती
लहान मोठी विविध रंगात
काहीं वर ठिपके बारीक
पंख हलवते क्षणा क्षणात. 4
अंडी ,अळी, कोष, पाखरू
चार अवस्था करुन पार
घेते अवखळ मोहक रूप.
भिरभिरण्या झाले तयार. 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा