अभा म सा प समूह 2
उपक्रम
विषय - आतुरता पावसाची
नको भासे उन्हाळा
नाही सहन होतेय
आता गर्मी नि उन्हाळा
वाट पहाती लोचने
येवो आता पावसाळा
झळा उन्हाच्या साहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली
वाट पाही बळीराजा
काळ्या मेघांना पाहूनी
नजरेत दिसे प्रतिक्षा
वरुणाला विनवूनी
जन सारे कंटाळले
वाट पाही पावसाची
कधी येतील जल धारा
होण्या तृप्तता मनाची
गुरे शोधती निवारा
चारा सारा वाळलेला
ठेवा पक्षांना पाणी
उन्हाने जीव कासावलेला
नको वाटे जाणे बाहेर
अंगाची होई लाही लाही
एकच उद्गार सर्व मुखी
पावसा शिवाय गारवा नाही.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय ... काहिली
*नको हा उन्हाळा*
नाही सहन होतोय
आता गर्मी नि उन्हाळा
होई अंगाची काहीली
वाटे यावो पावसाळा.
सूर्य ओकतोय आग
नाही जरा दया माया
भाजून काढी अंगाला
सारे जन शोधी छाया
सूर्याचा चढलाय पारा
येता मध्यांनी डोक्यावर
अती उच्च पदी थोर बिघडे
हा बोल वाटेची खरोखर
जन सारे कंटाळले
वाट पाही पावसाची
कधी येतील जल धारा
होण्या तृप्तता मनाची
गुरे शोधती निवारा
चारा सारा वाळलेला
ठेवा पक्षांना पाणी
उन्हाने जीव कासावलेला
नको वाटे जाणे बाहेर
अंगाची होई लाही लाही
एकच उद्गार सर्व मुखी
पावसा शिवाय गारवा नाही.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा