गुरुवार, १९ मे, २०२२

म्हण... जुने ते सोनं

सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन उपक्रम
उपक्रमासाठी
विषय - जुनं ते सोन

    *काळानुसार हवाच बदल*

खरे असे जुनं  ते सोन च
पण बदल हवाच जीवनी
काळ बदलता हवे परिवर्तन 
याचा ही  विचार  करावा मनी  1

रीती रीवाजात बदल
घडवून  आणलाच आपण
विज्ञानाची धरुनी कास
केले विचारात परिवर्तन   2

जुने आहेच ते सोने
संस्कृती  नका विसरु जगती
सामाजिक सुधारणा मात्र 
घडविण्यात  हवीच प्रगती  3

आपलेच म्हणणे मांडणे
मुरड न घालणे जुन्या  तत्वास 
जुने ते सोनं पटविणे
हा ठरतो खोटा अट्टाहास  4


जुने साहित्य  अभंग वाणी
 वाचू  गाऊ आपण नेटाने
परंपरा टिकविण्यात पुढाकार
नित्य  नेमाने दावु जोमाने          5

  जुन्याच्या संगतीत बदल
  कधी वाटतो सदा हवा
  प्रगतीला देतो   नवी दिशा
  जसा रोजचा सूर्य ची नवा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...