बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

लता दिदी गान कोकीळा/ जादु मधुर शब्दांची



अष्टपैलू  काव्यमंच ( महिला)
साप्ताहिक उपक्रम ६४
विषय  -गान कोकीळा
दि ९/२/२२
      *दुजी न होणे लता*
        
साधी  सोज्वळ रहाणी
लता दिदींचे जीवन
दिली प्रेरणा जनांना
स्वरातून  आजीवन

रोज ऐकतो भुपाळी
सात स्वरांची तू राणी
 भारतभूची होई सकाळ
 भाव पूर्ण  ऐकत गाणी

तव  स्वरातला गोडवा
भावगीत, भक्तीगीत
ओतप्रत   आळवलेली
देशभक्तीची  आगळीच रीत.

तुझ्या  स्वरांनी दिधले
भाव  विविध  मनाला
करुणा, दया ,तर प्रेरणा
चेतना जगण्या मानवाला

 तुझी गीते अजरामर
 ओठावर रुळलेली गाणी
 जणु  गोड अमृताची वाणी
ऐकता येईल डोळा पाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




अ भा म सा प समूह 1
काव्य प्रकार ओळ काव्य
विषय - जादू मधुर  शब्दांचीजादु  मधुर शब्दांची
  शीर्षक - गान कोकीळा

 सूर   ते  येती कानी
गोड स्वरांची भूपाळी
*जादु मधुर  स्वरांची*
जाग देई सकाळी


साधे शब्द अधरीचे 
किती गोडवा सुरात
मृदुलता विनम्रता
भरलेले हृदयात


दैवी देणगी दिधली
  आहे दिदी खरोखर
परी साधना तुझी ही
आहे तया बरोबर

 भारत रत्नचा   किताब
भारताची तूची शान
स्वर  साम्राज्ञी जगाची
तुम्ही भारताचा मान

आहे परी मनीच्छा
भेट घडावी जीवनी
कधी होईल ती पूर्ण  
हीच आस मनोमनी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...