वय चालल वाढत
दिन ,महीने , वर्षाचा
वेळ चालला सरत
कळे वळूनी पहाता
वय चाललं वाढत 1
कसा भुर्कन उडाला
रम्य होता बाल्यकाळ
मनी आठव येताच
वाटे तो सुवर्ण काळ 2
स्वप्ने रंगविली मनी
असताना तारूण्यात
वेळ सरली ती पण
आनंदात उत्साहात 3
बहरली साहित्यात बहरली साहित्यात
तव सुंदर लेखणी मम सुंदर लेखणी
रमतेस तू सदैव रममाण मी सदैव
फुलवण्या ती देखणी 4 फुलवण्या ती देखणी
लाभो निरोगी आयुष्य देवा तूची कृपावंत
घडो वृद्धी साहित्यात घडो साहित्याची सेवा
मिळो सुख समाधान मिळो सुख समाधान
वाढणा-या आयुष्यात 5 हाच जीवनाचा ठेवा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुजरात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा