अ भा म सा प ठाणे समूह आयोजित उपक्रम
विषय नवरत्न
*मोती*
रत्ने असती नऊ
मोती तयातील एक
काही म्हणा शान अनोखी
मोत्याची जरी रत्ने अनेक
तन्मणीत रुबाब मोत्याचा
दिसे ललना भारदस्त
शोभे कंठ चार जणीत
अलंकार जबरदस्त
पहा नथीतील मोती
वाढवी रुप शृंगाराचे
नाक चाफेकणी शोभे
लक्ष वेधते जनमनाचे
गुण असे मोत्याचा
राखी स्वभावास शांत
मोती रत्न आणती झळाळी
शृंगाराची नसे भ्रांत
आग्रहे सांगती ज्योतिषी
मोत्याला तेही देती मान
रत्नाकर उधळतो मोती
मोती अलंकाराची सदा शान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा