४/१/२२ व ५/१/२२
विषय - नव्या जुन्याची सांगड
*तडजोड मनाची*
जुन्या नव्याची सांगड
नसे आजचा विचार
चालणार कालांतरी
प्रश्न नाही सुटणार
काळा प्रमाणे बदल
नेहमीच घडणार
करा तडजोड मनी
सोपे सारे भासणार
प्रश्न तो सन्मवयाचा
जाणा काळाची आवड
होते मग बाब सोपी
जुन्या नव्याची सांगड
दोन काळात साम्यता
कसा जमवावा मेळ
सुसंवाद करा पहा
जमे छान ताळमेळ
काळा प्रमाणे पाऊल
टाका अगदी सहज
पहा साधेल सांगड
नाही वादाची गरज
नव्या युगाचे तंत्रज्ञ
करी जगाला प्रगत
झाली उन्नती जगाची
झालो आता सहमत
वैशाली वर्तक .
अहमदाबाद
५/१/२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा