विषय -लक्ष्मी तू नव्या घराची
झाला संपन्न लग्न सोहळा
वेळ आली सासरी स्वागताची
वदली वर माय तिजला
लक्ष्मी तू या नव्या घराची
तुझ्या पाऊले आनंदेल घर
कौतुकाने करु गुणगान
तूच असशी स्वामीनी
तुझा राहील कुटुंबात मान
आहेस तू गुणांनी संपन्न
पाहू तुझिया कला अवगत
नको बावरु लाजू अजिबात
सांग तुझे आम्हा मनोगत
जिंकून घे तू कुटुंबियांना
तुची असशी घराची राणी
मिळेल तूज सारे न मागता
गातील तव कौतुकाची गाणी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा