शब्दसेतू साहित्य मंच
1 कविता - नदी
येते धावत सरिता
मिळण्या ती सागराला
अर्पूनिया गोड पाणी
स्विकारे खा-या पाण्याला
देते जीवन प्राणी मात्रा
येताना वहात खळखळ
करते हिरवी शिवारे
येते पुढे पुढे अवखळ
विसरते अस्तित्व स्वतःचे
होता मिलन सागराशी
जाण्या बाष्परुपे आकाशी
एकरुप होते खारेपणाशी
घेउनिया रुप जलदाचे
जाते खेळाया नभात
ढगांची गट्टी डोंगराशी
पडे खाली पर्जन्य रुपात
वैशाली वर्तक
शब्दसेतू साहित्य मंच आयोजित
साप्ताहिक उपक्रम क्र ३/२०२२
विषय -नदी
2 साहित्य कथा लेखन कथा
*जीवनदायिनी*
म्हणतात ना! अजाणत्या पाण्यात सहजा सहजी उतरु नये. हेच खरे.
लहान होते मी ..नुकतीच पोहणे शिकले होते. घरी पाहुणे आले होते . सारे म्हणाले चला जाऊ नदीवर ..डुंबून येऊ.
मी नवीन पोहावयास शिकलेले होते साधारण इयत्ता ४/५वीत असेन. मला माझे पोहणे नाते वाईक मंडळींना दाखविण्याचा मला हुरुप आला. . ..
ठरले निघालो नदीकडे.. घरापासून जवळच होती. आते मामे भावंडे होतो. त्यात एक आते भाऊ. तो पण आला होता. किती प्रमाणात पोहणे त्यास येत होते हे आता आठवत नाही. अर्थात मोठी मंडळी होतीच बरोबर.
नदीवर पूल बांधण्याचे काम चालू होते . तसे आमच्या नदीत पाणी कमीच असायचे. खोल तर नसायचे. नदीच्या एकाच तटाला पाणी... बाकी दुसरा तट कोरडाच...
इतका कोरडा की आमच्या शाळेची शनिवारची कवायत त्या नदीच्या पटात व्हायची. ऐवढेच काय थंडीत सर्कस पण लागायची.
आम्ही जेथे पाणी होते तेथे गेलो. नदीवर नवा पूल बांधण्यात येत होता. त्याबाजूस जरा ब-यापैकी पाणी होते. तेथे गेलो.
पूलाचे खांब अर्धवट बांधले होते, त्या मुळे त्यावर चढून खाली पाण्यात उडी मारण्यास मजा येत होती. पाणी 7/8 फूट खोल असावे. मी पोहण्याचे प्रशिक्षण घेत होते ... त्यामुळे तेथे लहान डायवींग बोर्ड वरुन उडी घेणे माहीत होते.. शिकले होते . त्यामुळे मी मारली उडी.व लगेच कसे बाहेर यावयाचे हे शिकवले असल्याने वर पण आले . मजा वाटू लागली. मी पुन्हा पुन्हा उड्या मारल्या.
..... पण बरोबर आलेल्या आते भावास पोहणे जमत नव्हते . पण तो पण वर चढला व उडी मारली.. तो पण लहानच होता. माझ्या इतकाच. पण व्यवस्थित पोहण्याचे शिक्षण घेतले नसल्याने नाका तोंडात पाणी जाऊन घाबरला.... बरे झाले. बाजुलाच मोठी मंडळी , नातेवाईक होते .त्यांनी हात देऊन खेचून घेतले. डुबला नसता पण त्यावेळी तो घाबरला.
मग आम्ही घरी येत होतो ..बाकी इतर मंडळी पोहत होती तेथे येत होतो. तर पाऊलभर पाण्यात पाय ठेवायला तो आते भाऊ घाबरत होता.
रडतच म्हणत होता," नको मी डुबेन पाण्यात . मी पाण्यात पाय नाही ठेवणार .."
.चांगलीच भिती त्याला पाण्याची बसली.
तर असे असते .पाण्याशी ...अजाण पाण्याशी उगाच मस्ती नको. नाहीतर जीवनदायिनी जी नदी , जीव घेणी बनते. नाहीतर तीच नदी प्राणी मात्रा स जीवन देते.
जिच्या काठावर संस्कृती वसल्या आहेत अशी नदी जीव घेणी होते का?
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्दसेतू साहित्य मंच
साप्ताहिक उपक्रम 3/22
3 पत्र लेखन
विषय -नदी
माते साबरमती
तुला शत शत प्रणाम,
तुझ्या सहवासात लहानाची मोठे झाले. तेव्हा ब-यापैकी पाणी पात्रात असायचे. अर्थात तुझे पात्र पण छानच विशाल आहे. त्यावर धरणे बांधल्याने पाण्याचा ओध पुढे कमी होत गेला. त्यात पाऊस कमी पडल्याने तसा गुजरात मधे पाऊस बेताचाच. त्यामुळे ... पुढे पुढे तर पाणी फारच कमी होत गेले. तसेच तुझ्या हृदयी मोठे मोठे पंप लावून तुझ्या गोड पाण्याचा उपसा खूपच वाढला. कोणी धोबी घाट काढले तर भाजी पाल्यासाठी पाण्याचा उपयोग . असे केल्याने जमिनीतील ओलावा वाळला.. कोरडे पण वाढत गेले. व ते इतके की शेवटी नदी पेक्षा तुला वाळवंट रूप आले. शेवटी नदीच्या पात्रात सर्कस पण लागायची.
तुझे रुप बघवत नव्हते . पण आता धरणात अडवलेले पाणी सोडून समान पातणीत पाणी राहील अशी सोय केली आहे की सतत पाण्याने भरलेले तुझे मनोहर रूप दिसते. व स्वच्छतेची काळजी पण फार घेतली जात आहे. नदीच्या तटाला बांधून, झाडे लावून तट सुशोभित केले आहेत..आज तेच रिव्हर फ्रंट म्हणून ओळखले जात आहेत. त्याच रिव्हर फ्रंट वर अनेक कार्यक्रम होतात. तुझे रूप छान दिसते. आता नागरिकांना पण पर्यावरणची जागृती आली आहे.
मेहेसाणा जिल्ह्यात वडनगरला धरोई धरणला तुझे भव्य रुप पहावयास मिळते. तेथे ते रूप पाहून कळते की किती मोठा जलाशय आहे.
आज खास तुला पत्रातून तुझ्या सध्याच्या रूपाचे गोडवे गावे असे वाटले. लहानपणी तुझ्या विस्तारात खेळलेले दिवस आठवून जीवनदायिनी खूप छान वाटले. तुझे अनंत उपकार असेच पुन्हा नव्या घडामोडी झाल्या की बोलेन पत्रातून .
तुझ्या लाडात वाढलेली
वैशाली
अहमदाबाद
शब्दसेतू साहित्य मंच आयोजित उपक्रम
क्र 3/22
4 संवाद नदी आणि मी
रोजच्या नदीच्या तटावर मी ठरल्या जागी बसले . तेवढ्यात
एक बाई आली , हळूच इथे तिथे पहात तिने खाललेल्या दाण्याच्या पुड्याचा कागद नदीत भिरकावला. मी लगेच तिला टोकले. तर ती sorry sorry म्हणाली
तेवढ्यात पाण्यात तरंग उठले तर आतून हसण्याचा आवाज आला. मी पहाते तर नदीतून आवाज..
नदी - अग इथे पहा मी च हसले आणि धन्यवाद हं
मी -- अग कसले ?कशा बद्दल ?
नदी - तूत्या बाईला चांगली शिकवण दिलीस .
मी -- हो ग !अग पहा इथे म्युनिसीपालटीने दर 10 फूटावर
कचरा डबे ठेवले आहेत ,तरी आळस ग . दोन पावले
चालण्याचा .
नदी - हो पहा ना आता जागरुकता येत आहे तरी ssss..पण
मी --- हो हळू हळू आमच्यासारखे बोलतील व तुझे रूप ख-या अर्थाने पवित्र स्वच्छ रूप होईल.... जे आम्हीच मलीन केलय व करतोय
नदी -- हो खरय अग माझ्यात जलसृष्टी पण वसते ना !.त्याची पण मला काळजी अस
असतेना
मी -- हो, कधी कधी काय केमिकल पण पाण्यात सोडतात. त्याने ती जल सृष्टी
मरते ना. तू खरच माता आहेस उगा का तुला माता संबोधतात.जल चर सा-याची
तुला काळजी. उगाच का तुला माता म्हणून संबोधतात. .
नदी -- हो ग ...पाटातून माझे पाणी वहात जाते .खळखळ आवाज करत मी वहाते
व बळीराजाचे हसरे मुख पहातेना तेव्हा मला छान वाटते.व त्याची शिवाराची
चिंता मला समजते. ते नेहमी हसरे रहावे आसे मनी वाटते
मी -- खरय ग इतकेच नव्हे. तू तुझ्या तटावर किती वसाहती वसल्या .सा-या
संस्कृती चे तूच संभाळ केलेत. तुझ्या अनेक भगिनींनी .
आर्य संस्कृती सिंधू नदीच्या किनारी वसली. तुम्हा सर्व भगिनींचे अनंत
उपकार आहेत. सर्व भगिनींना प्रणाम करते हं
नदीतून एक मासोळी हळूच डोके वरा काढून आत लुप्त झाली ..पाण्यात उठलेल्या
तरंगा कडे मी पहात राहीले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा