शब्दरजनी साहित्य समूह
आयोजित भव्य राज्यस्तरिय काव्य लेखन उपक्रम
विषय - ओढ
- ओढ लेखणीची
ओढ
रोज लिखाण करिता
ओढ लागली सदाची
माया सहज जडली
लेखणीची कागदाची
ओढ खुणावी मनाला
काही तरी लिखाणास
सेवा करुया भाषेची
हीच मनी सदा आस
काव्य करितांना रोज
चाले शब्दांचाच खेळ
शब्द शब्द विचाराने
जमविते काव्य मेळ
मना मनातील गुज
सांगावया सोपी रीत
सहजची होते व्यक्त
यात जडली ही प्रीत
हीच मागणी शारदे
चित्ती राहो तव मूर्ती
ओढ लागली जीवाला
तूच दे मजला स्फूर्ती .
......वैशाली वर्तक
विषय - ओढ तुझ्या दर्शनाची
अष्टाक्षरी
*अधीर मन*
ध्यानी मनी स्मरे तुज
तुझ्या नामाचे रटण
राहो तुझे रुप चित्ती
सदा करिते स्मरण
मुखी घेता तव नाम
विसरते देहभान
तुझ्या दर्शनाची ओढ
गाते तव गुणगान
तुझ्या नामाचा गजर
चाले सदा क्षणो क्षणी
आस तुझ्या दर्शनाची
लागे सदा मनोमनी
माते तव दर्शनाला
मन माझे आतुरले
कधी पाहीन तुजला
मन माझे अधीरले
तव रूप पाहुनिया
मन माझे आनंदले
प्रसन्नता लाभे जीवा
हर्षे मन विसावले
आस लागली अंतरी
आले आता मी शरण
द्यावे माते तू दर्शन
दाखवावे तव चरण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा