सोमवार, २६ जुलै, २०२१

अष्टाक्षरी रुप सावळे सुंदर

माझी लेखणी आष्टाक्षरी मंच
अष्टाक्षरी
       *माझा विठुराया*

माझ्या  विठ्ठलाचे पहा
रुप सावळे सुंदर 
भान माझे हरपते
वाटे पाहू निरंतर                 1

भाळी उटी चंदनाची
गळा तुळशीच्या माळा
कर कटी वरी  शोभे
दाटे पाहता उमाळा                 2

कानी कुंडले शोभती
मुख भासे ते सुंदर 
कटी शोभे  पितांबर
मना भासे मनोहर            3

रुप तुझे आवडीचे
सदा नयनी ठसते
डोळा भरुनी सदैव
चित्तातून मी पाहते        4

*रुप सावळे सुंदर* 
आता  दाखवा चरण
कधी देशील दर्शन  
आले तुजला शरण            5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...