कोसळले आभाळ
सुरु झाला ऋतु वर्षा
नभ दाटले मेघांनी
दाहकता कमी भासे
आदित्याची नभांगणी
गर्दी जलदांची नभी
गर्जताती कृष्ण मेघ
झाली घाई बरसण्या
मधे चमके वीज रेघ
ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहतो जोरात
घन आले ओथंबूनी
लपंडाव चाले खेळ
मेघ गातात मल्हार
जमे पावसाचा मेळ
कड्यातून वाहे झरे
जणू शुभ्र दुग्ध धारा
खाच खळगे भरले
शीळ घाली मंद वारा
जणु सरी मोतीयांच्या
भासताती जल धारा
वाहे ओहोळ सर्वत्र
ओली चिंब झाली धरा
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा