शनिवार, २ मे, २०२०

कोरोना विषयक(कविता)


**बंदिस्त  चार भिंतीत**

बंदीस्त चार भिंतीत
रहाण्याची आली वेळ
वाढता मरण आंकडा ऐकून
जनता वदली हा तर मरणाचा खेळ

आपलेच नैतिक कर्तव्य
पाळावे प्रत्येकाने समजुती ने
सुखी निरोगी जीवना साठी              
का आणावी वेळ बळजबरीने

बसा रहा बंदिस्त सारे
करा वाचन विवचन लिखाण
रहा परिवारा संगतीने
नको बाहेरचे ठिकाण

देऊया लढा कोरोनाला
पाळता नियम सरकारचे  
आपले स्वास्थ्य जपता
दुस-यांचे आरोग्य जपायचे..

रहा बंदिस्त घरातूनी
जिवाणुंचा होणार नाही प्रसार
 स्वास्थ्य केंद्रे होस्पिटल मधे
नको उगाच पेशंटचा भडिमार

स्वातंत्र्य वीर राहिले बंदिस्त
सोसूनी अपार कष्ट देशासाठी
रचिले महान ग्रंथ तयांनी
राहूया आपण आपल्या हितासाठी

वैशाली वर्तक.

विनवणी

देवा करिते विनवाणी
करना कृपा जगावरी
किती भयावह  वेळ ही
उघड ना ,नयन क्षणभरी

सारे व्यवहार झाले ठप्प
घरीच बसावे लागे नित्य
रोज कमविणे व खाणे
त्या हातांना लागे ना चित्त

कुठून आणतील भाकर
कसा देतील लेकरामुखी घास
तूची तारण्यास देवा आता
सूचवना उपाय हमखास


जाण तू भाव अंतरीचे
दूर करण्या ही अवस्था
सारे जन करती तव धावा
विस्कळीत झाली सुव्यवस्था.

करुया वंदन देश सेवकांना.

सारे विश्वची ग्रासले संकटात
  पसरता विषाणु जीवाणु ,कोरोना नामक.
देश सेवक करीती सेवा
जरी महामारी असता प्राण घातक

शहर गाव राखण्या स्वच्छ
सफाई कामगारांचे नित्य लक्ष
आपले आरोग्य तयांच्या हातात
कर्तव्यात ते राहती सदाची दक्ष

बंदिस्त रहाणे हेची उचीत
कठोरपणे सांगे शासन
खादी वर्दी उभी उन्हा तान्हात
आपणासाठी पोलीस प्रशासन

वाढतोय अंक महामारीचा
सुश्रुषा करती रात्रंदिन अभयाने
डॉक्टर परिचारिका , मदतनीस
राबती न डगमगता मृत्यू भयाने

किती ऋण या देश सेवकांचे
करिती सेवा निष्ठेने जनांची
वंदन असो या महा-विभुतींना
ठेवुया चाड त्यांच्या ऋणांची

दिनरात करिती काम
  नुरते तयांना वेळेचे बंधन
 घालून स्व- जीव धोक्यात
  या देश सेवकांना शतदा वंदन


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...