बुधवार, १७ जुलै, २०१९

दैव चाराक्षरी

दैव
करा कर्म
यशा साठी
दैव येते
सदा पाठी

नका करू
चिंता कधी
वसे देव
कर्मा मधी

भाग्या कडे
पाहू नका
परिश्रम
सोडू नका

कर्म करा
सातत्याने
दैव येते
प्रामुख्याने

कर्म गती
सदा न्यारी
हाती येते
यश झारी

दैवा वर
विसंबला
कार्य भाग
तो थांबला

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...