सोमवार, ७ जानेवारी, २०१९

स्वन्पातील नववर्ष

स्पर्धेसाठी
विषय ः- स्वप्नातील नववर्ष

नववर्ष स्वन्प माझे
रंगविले होते मनांत
कितपत पाहू होते
साकार ते प्रत्यक्षात

      स्वच्छ असेल सुंदर
        देश भारत महान
       समानता ही नांदेल
      नसता कोणी लहान

कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होई मुलगी साक्षर
सावित्री रूपे देखणी

         वृक्षारोपणाचा नारा
         गाजवूया या जगती
         पृथ्वी पाहू नटलेली
          भासे जणू रूपवती

किण किणली ती घंटा
जागे झाले स्वन्पातूनी
नाद आला मंद कानी
रम्य ते स्वन्प पाहूनी.

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...