सोमवार, ७ जानेवारी, २०१९

स्पर्धेतील चारोळ्या

स्पर्धेसाठी..... विषय--- पितृपक्ष
असते ऋण पितरांचे आपणांवरी
करण्या परत फेड तयांच्या ऋणाची
अन् दिलेल्या भरभरुन आशीषांची
परंपरा चालत आलीय पितृपक्षाची. .
..वैशाली वर्तक (अहमदाबाद ).

चित्र चारोळीं ---
मेघांनी भरलय अंबर
संथ वाहे निर्मल सरिता
घेऊन तव हात करी
रचूया जीवन कविता ...
वैशाली वर्तक

साहित्य मांदियाळी क्र 91
विषय-- सलाम वर्दीला
अजून स्मरते ती काळ रात्र
निष्पाप जनतेचे गेले प्राण
आनंदाने स्वीकारून वीर मरण
जवानांनी राखली वर्दीची शान .....
वैशाली वर्तक.

स्पर्धेसाठी चारोळीः-
साहित्य मांदियाळी स्पर्धा क्र 92

कर्ता तोचि संविधानाचा
दलित जीवनाचे केले नंदनवन
भारतरत्न चा मिळाला मान
करूया तयांना मानाचे वंदन ...
..वैशाली वर्तक

स्पर्धे साठी चारोळी
मनस्पर्शी विषय ः--ंसंकल्प
मनीं गर्दी जमली विचारांची
लागता नववर्षाची चाहूल
कोणता बरे करावा संकल्प
विचारातच टाकले नव वर्षात पाऊल
वैशाली वर्तक (अहमदाबाद)

चित्र चारोळी स्पर्धा क्र.९३ स्पर्धेसाठी
चारोळीः-
- दोन हात भासती वृक्षासम
पाना फूलांनी झाड आले मोहरून
पक्षी विसावले निवांत तयावर
रुप दिसे वसुंधरेचे बहरून ...
.वैशाली वर्तक (अहमदाबाद)

सडे घातले केशराचे नभांगणी
सोनेरी किरणांनी वृक्षे न्हाली
रवी किरणात प्राची उजळली
सुप्रभात म्हणण्याची वेळ झाली

निरोप देत  गतवर्षाला
आतुर सारे आगमनाला
नवीन करुनीया संकल्प
ध्यानात घेऊनी उत्कर्षाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...