चित्र काव्यः--- जीवन बिगारीचे
होता रोज सकाळ , करावया येतो काम
दोघे मिळूनी राबतो , मानीतो हे तीर्थ धाम
"परिश्रम " मानून देव , अतोनात करितो कष्ट
सौख्य येईलच दारी , ठेव देवा सदा पुष्ट
करावया सुखी संसार , साथ तुझी मिळो सदा
सखे धरिला हात तुझा , सोडू नकोस तो कदा
एका हाताने तान्हुला दुजा सावरी मातीला
साथ राहूनी धनीच्या बळ वाढवी कामाला
तुझ्या माझ्या राबण्यास , देव नक्की देई न्याय
दृढ श्रध्दा तयावर , करी न कोणा अन्याय
दिन नक्की पालटेल , पु-या होतील उणीवा
खोली मालकीची बांधू , मनीं ठेवल्या जाणीवा
देवाजीने दिला जन्म , वाया न जावो निरर्थक
काम करूया कसूनी , करू जीवनाचे सार्थक
मोठा होईल तान्हुला , तोचि आपुला आधार
तया करुया साक्षर , ईच्छा होईल साकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा