चाळा
चाळा जो लागतो जीवा
वारंवार तेच करण्याचा
तयाचा लागतो लळा
करी प्रेरित चाळयाला
चाळा जो लागला जीवा
गुंततो जीव चाळ्यात
हरपते भान वेळे च
असे हा हुकूमी एक्का
विरंगुळा म्हणोनी जोपावा
चाळा जो लागला जीवा
कुणी चाळ्याने उडवी खांदे
तर कोणी मारती डोळे
गळ्याशी येती हे चाळे
नसावेत तापदायी चाळे
चाळा जो लागला जीवा
चाळा टाळी मागण्याचा
म्हणती "द्या टाळी" सर्वदा
अंती नाव तयांचे ते झाले
स्वीकार करणे टाळ्यांचे
चाळा जो लागला जीवा
मनी काळजी वा चिंता
चाळा असे नखे खाण्याचा
भरे डोक्यात विचार माळा
अन् नुरती नखे बोटाला
चाळा जो लागतो जीवा
या युगाचा एकची चाळा
मान खाली राखती सदा
सदैव लागे फोन साथीला
न होई संवाद एकमेकात
चाळा जो लागतो जीवा
असे हे विविधतेचे चाळे
तयांचे वेड हे लागे
जतन जे करिते तयांचे
वेळ छानसा जातसे
चाळा जो असावा जीवाला
.
चाळा जो लागतो जीवा
वारंवार तेच करण्याचा
तयाचा लागतो लळा
करी प्रेरित चाळयाला
चाळा जो लागला जीवा
गुंततो जीव चाळ्यात
हरपते भान वेळे च
असे हा हुकूमी एक्का
विरंगुळा म्हणोनी जोपावा
चाळा जो लागला जीवा
कुणी चाळ्याने उडवी खांदे
तर कोणी मारती डोळे
गळ्याशी येती हे चाळे
नसावेत तापदायी चाळे
चाळा जो लागला जीवा
चाळा टाळी मागण्याचा
म्हणती "द्या टाळी" सर्वदा
अंती नाव तयांचे ते झाले
स्वीकार करणे टाळ्यांचे
चाळा जो लागला जीवा
मनी काळजी वा चिंता
चाळा असे नखे खाण्याचा
भरे डोक्यात विचार माळा
अन् नुरती नखे बोटाला
चाळा जो लागतो जीवा
या युगाचा एकची चाळा
मान खाली राखती सदा
सदैव लागे फोन साथीला
न होई संवाद एकमेकात
चाळा जो लागतो जीवा
असे हे विविधतेचे चाळे
तयांचे वेड हे लागे
जतन जे करिते तयांचे
वेळ छानसा जातसे
चाळा जो असावा जीवाला
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा