बातमी
सकाळी चहाच्या कपा सरशी ,
आठवण येते ती माझीच ,
चुरचुरीत मजकुराने बातमीपत्रात,
भरलेल्या माझ्या अस्तित्वाची .
वर्तिले काय कोठे?
शोधिले काय कसे?
तंतोतंत तपशिले,
जाणण्यास आतुरता मनी दाटे .
माझ्याच अस्तित्वाने ,
किंमत असते बातमीपत्रास
केले वाचन एक वार ,
अन, बातमी पत्र रद्दीला भार.
काय करणार मिडिया ,नु'रता मी ,
सुन्या पडणार वाहिन्या ,माझ्या -विण ,
चुरस कशी लागणार ,तयात सदा ,
प्रसारित करण्यात, सर्वप्रथम मला.
पापणी लावण्या अवधीत ,
. पोहचते जगाच्या काना कोप-यात
प्रगत टेली-कॉम्युनिकेशन ने
गती माझी, झाली अफाट .
गेले , ते दिन पूर्वीचे ,
गावाच्या वेशी ,झाडाच्या पारी ,
व्हायची चर्चा माझी,
तोंडोतोंडी मला चघळण्याची ,
असती माझ्या त-हा अनेक,
मंदगती तर कधी जलद ,
मुक बधिरांसाठी तर ,
केले जाते खास आयोजन .
घडविण्यात रामायण ,
ठरले मीच कारणभूत ,
मंथरे करवी मला देवून,
कैकयीचे दिले कान फुंकून .
सुख दुखाचे , कधी हर्ष उल्हासाचे ,
आनंद वा इशारे भयाचे ,
मम हृदयी भाव वसती सारे
मम हृदयी भाव वसती सारे
विविध अशा भावनांचे ,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा