स्नेह सोहळा
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
दिवा ,दिव्याची ज्योत सांगते तुम्हा
दीप स्नेहाचा प्रज्वलित करुनी
लेकी, सुना , व्याही, जावई मिळूनी
नातू ,नाती ,पणतू , पणती ,
सदनी रमली पुलकित होऊनी
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
पारंपारिक गुळ पोळीला
करुनी संगत नव काळाची
अंगणी रमली, गाण्यात गुंगली
पंगत केली चायनीज, मस्तीची
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
लुटूनीया वाण सौभाग्याचे
अनघा अनुने घेतले आशिष मोठ्यांचे
तीळ -गुळ देऊनी माहेर वाशीणींना
वंदन करिती थोरा मोठ्यांना
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
गुर्जर वासी आपण पूर्वीचे
कसे विसरणार पतंगा' ते
रंगबिरंगी पतंग उडविले
मोद भरे नील गगनात
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
शेकोटिला कॅम्पफायर संबोधुनी
दुग्ध शर्करा योग येता जुळुनी
लग्न , जन्म दिन व्याहांचा
केला साजरा सर्वांनी मिळूनी
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
करुनी आयोजन भावी सोहळ्याचे
सांगता करुनी गुरु- स्तवनाने
स्मरता गुरुचरणांना भक्ती भावे
मना- मनातून आनंद हा दाटे
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
दिवा दिव्याची ज्योत सांगते तुम्हा
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
दिवा ,दिव्याची ज्योत सांगते तुम्हा
दीप स्नेहाचा प्रज्वलित करुनी
लेकी, सुना , व्याही, जावई मिळूनी
नातू ,नाती ,पणतू , पणती ,
सदनी रमली पुलकित होऊनी
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
पारंपारिक गुळ पोळीला
करुनी संगत नव काळाची
अंगणी रमली, गाण्यात गुंगली
पंगत केली चायनीज, मस्तीची
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
लुटूनीया वाण सौभाग्याचे
अनघा अनुने घेतले आशिष मोठ्यांचे
तीळ -गुळ देऊनी माहेर वाशीणींना
वंदन करिती थोरा मोठ्यांना
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
गुर्जर वासी आपण पूर्वीचे
कसे विसरणार पतंगा' ते
रंगबिरंगी पतंग उडविले
मोद भरे नील गगनात
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
शेकोटिला कॅम्पफायर संबोधुनी
दुग्ध शर्करा योग येता जुळुनी
लग्न , जन्म दिन व्याहांचा
केला साजरा सर्वांनी मिळूनी
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
करुनी आयोजन भावी सोहळ्याचे
सांगता करुनी गुरु- स्तवनाने
स्मरता गुरुचरणांना भक्ती भावे
मना- मनातून आनंद हा दाटे
सहज चालवा स्नेहाचा हा सोहळा
दिवा दिव्याची ज्योत सांगते तुम्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा