सम
देवाजीचे द्वारी ।
असे सम भाव ।।
सर्व समान त्यांशी ।
प्राणीमात्र ।।
सृष्टी पहा कशी ।
ठेविते सम दृष्टी ।।
न करिता दुजाभाव ।
कोणा संगे ।।
नदी देते जल ।
सर्वांना सारिखे ।।
न करिता विचार ।
राव, वा रंक ।।
सूर्य, चंद्र, तारे ।
सम प्रकाशती ।।
न राखिता भेदभाव ।
कोणा जाति ।।
मातेच्या प्रेमाला ।
सर्व समान लेकरे ।।
मातृप्रेम देई ।
सर्वांना सारिखे ।।
नको हेवे दावे ।
नको भेद भाव ।।
सर्व धर्म समान ।
सांगे संत वाणी ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा