देऊळ
बालपणीच्या आठवांचे,
देऊळ होते विठुरायाचे.
शीतल सरितेच्या तीरावरचे,
जणू मांगल्याची प्रतिमा भासे.
देऊळाच्या सभोवताली,
आम्रतरू अन वनराई .
सारवलेल्या अंगणातुनी,
सडा रांगोळी रोजच होई
एकतारीच्या सुरा मधुनी,
विठ्ठल गीते कुणी गाई.
भक्त जनांचा थवा, भजनातूनी ,
तिन्ही त्रिकाळ रंगुनी राही .
कधी पथिक येउनी तेथे ,
विसावा घेती खांबाशी.
तर कोणी मनोगत अपुले,
सांगे विठोबा रखु मायेशी
पण आज , न तेथे उरले,
जुने देऊळ वा राऊळ ते .
कुणा धनिकाने रूप तयाचे,
पालटविले देवालया ' ते
जुने खांब जाऊनी तेथे,
रत्नजडीत खांब आले .
मिणमिणते जाऊनी काजवे,
लखलखित दिपमाळा चमके
.
नक्षीदार गोपुर तयाचे ,
कळस , अन वर ध्वजा शोभे
देवालयाची शान पाहुनी,
मन क्षणभर हर्षुनी गेले .
पण एकच खंत मनात राहे,
शीतल सरितेच्या तीरावरचे
न ' ते ' वदता "विठ्ठल नामे
प्रचलित झाले "धनिक " नावें .
प्रचलित झाले "धनिक " नावें .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा