माझ्या बागेतील फुले (बाल कविता)
माझ्या बागेत फुले अनेक
सांगते तुम्हाला नांव एकेक
दारात पहा बोगन उभी लवून
विसावा देते सर्वांना खाली वाकून
जवळच बहरला झेंडू छान
सर्वांच्या स्वागतास झुकवितो मान
ताटवी ही गुलाबाची फूलली
देव्हा-यात पूजेसाठी सजली
जुई कशी खिडकीशी लवून
सुगंध पसरवीते घरात डोकवून
टपोरा मोगरा हरपतो भान
केसात माळण्याचा त्याला मान
शेजा-यांचा बहरला पारिजात
सडा मात्र माझ्या अंगणात
डौलात उभी रातराणी
रात्री म्हणते नीज राणी.
वैशाली वर्तक
माझ्या बागेत फुले अनेक
सांगते तुम्हाला नांव एकेक
दारात पहा बोगन उभी लवून
विसावा देते सर्वांना खाली वाकून
जवळच बहरला झेंडू छान
सर्वांच्या स्वागतास झुकवितो मान
ताटवी ही गुलाबाची फूलली
देव्हा-यात पूजेसाठी सजली
जुई कशी खिडकीशी लवून
सुगंध पसरवीते घरात डोकवून
टपोरा मोगरा हरपतो भान
केसात माळण्याचा त्याला मान
शेजा-यांचा बहरला पारिजात
सडा मात्र माझ्या अंगणात
डौलात उभी रातराणी
रात्री म्हणते नीज राणी.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा