मंगळवार, २७ मे, २०२५

वृत्त बध्द पादाकुलक2 ..नाहीभरवसा क्षणाचा 2माझे मला कळेना

कविता 1......

पादाकुलक

२८\५\२५

नाही भरवसा क्षणाचा


 आहे अगदी खरेची कथन

 नसे भरवसा कधी क्षणाचा

 निसटते जशी  रेत   हातची

वेळ हा सरे आयुष्याचा


  येईल खचित  उद्या  दिवाकर

  शुभची सकाळ  करण्या  मंगल

   तीच आजची सुख शांतीची

आला क्षणची करण्या चंगळ


   दिन तर सरती   क्षणा क्षणाला 

   नको रहाया मनात आशा 

   नसे भरवसा कधी क्षणाचा

   नकोच पदरी उगी निराशा

  

देवे दिधला. जन्म  मानवी

विचार करण्या असेची मती

 बहाल करिता  मेंदू त्याने

वाढव आता कामात गती


   काळ हातचा क्षण भाग्याचा

 नको पहाणे वाट उद्याची

 गवसत नाही दुसरी संधी

हीच असावी रीत यशाची. 

वैशाली वर्तक


2.....

वृत्त पादाकुलक

(पद्मावर्तनी समजाति)

मात्रा८-८=१६


  शीर्षक.माझे मला कळेना



समोर दिसता  रोज टिप्पणी     

मनात आले विचार काही 

करून वंदन  सरस्वतीला

लिखाणास मन उत्सुक राही


 शब्द मनीचे  झरू लागले

 ओवत गेले  मी शब्दांना 

 सहज जाहली तयार कविता 

झरू लागता शब्द फुलांना.           


मलाच माझे नाही कळले

कशी प्रसवली मजला कविता 

पठण करूनी पुन्हा पाहिले  

जना भावली माझी रचिता 


देत चालना कल्पकतेला  

 नेहमी स्फुरे  पहा लेखणी.

छंदच जडला आता मजला

झरणी माझी  दिसे देखणी


विचार येता शब्द गुंफता

शब्दकार मी कशी जाहले

नित्य लिहीणे सराव घडिता

मलाच माझे नाही कळले


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...