प्रेमाची अक्षरे
आयोजित अभंग लेखन
विषय - तेल वाती
आले नवरात्र । करूया तयारी ।
मनास उभारी । सदासाठी ।। १
घासून पुसून । काढिले दीपक ।
आहे उपासक । अंबाईचे ।। 2
घट स्थापनेला ।घरे उजळली ।
आनंदे भरली । सण आला ।। 3
देवी ठेउनिया । प्रसन्न वदने ।
गाऊया कवने । भक्तीभावे ।। 4
येता आदिमाता । मागू सुख शांती ।
लावा तेल वाती । रोजरात्री ।। 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय - माहेर
शब्दच माहेर । करी आठवण ।
मनी बालपण । आठवते ।।
प्रेमाचा तो हात । भासे अंगावर ।
फिरे क्षणभर । आईचा तो ।।
क्षणोक्षणी सय । आजीची ती माया ।
ममतेची छाया । मनी सदा ।।
दिन ते मौजेचे । ओढ सदैवाची ।
आस माहेराची । लागे सदा ।।
लेक सोडुनिया । स्वतःचे माहेर ।
जणु तो आहेर । सासराला ।।
वैशाली वर्तक
अहमदाबाद
स्वाक्षरी
*स्पर्धेसाठी*
अभामसाप धुळे जिल्हा
सहाक्षरी. काव्यरचना
विषय ... माहेर
*आवडीचे स्थान*
शब्दची माहेर
करी आठवण
उभे डोळ्यापुढे
सारे बालपण.
प्रेमाचा तो हात
भासे अंगावरी
आईचा फिरला
पहा क्षणभरी
क्षणोक्षणी सय
आजीची ती माया
मनात दडली
ममतेची छाया
दिन ते मौजेचे
ओढ सदैवाची
मनी लागलेली
आस माहेराची
लेक सोडूनिया
स्वतःचे माहेर
जणु सासराला
असे तो आहेर
खुशाली कळता
जीव आनंदतो
तरी भेटीसाठी
सदा आतुरतो.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कृष्ण जन्म... अभंग
वसुदेव निघे / यशोदेच्या घरी/ नदी वाट करी/ होता स्पर्श
पुत्र देवकीचा / येता नंदा घरी/ आनंद नगरी / घरोघरी
रुप ते सावळे / कृष्ण ची वदती / मोदे खुणावती / यशोदेला
जन्म मथुरेला /वाढला गोकुळी/ यादवांच्या कुळी / नंदलाला
हाते कुरवाळी / खट्याळ मोहक / चित्ताला वेधक / घनश्याम
घरी कृष्ण येता/ जन सारे गोळा / जन्माचा सोहळा / साजरा तो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा