सोमवार, २९ जानेवारी, २०२४

सुख दुःख




KAमराठी प्रेरणा प्रतिष्ठान
उपक्रम क्रमांक 60
विषय....सुख दुःख
अष्टाक्षरी
    शीर्षक. लपंडाव जीवनी

लपंडाव जणु चाले 
सुख दुःखाचा जीवनी
कधी सुख, तर दुःख
नका करू खंत मनी

जसे श्रावण मासात
ऊन पावसाचा खेळ
तसा चाले आयुष्यात 
 त्याचा बसवावा  मेळ

निशे नंतर प्रभात
नसे सदैव तिमीर
पहा कशा नव्या आशा
ऊषा दावण्या अधीर

 दुःख न चुकले कोणा
पुष्प हसते काट्यात  
उमलून विराजते
 गणेशाच्या चरणात

तप्त तापून धरती
बरसता जलधारा
 मग शोभिवंत होते 
  नव वधु सम धरा.

असा असे  नित्यक्रम 
  हेची सांगे  संत जन
 राम कृष्णे साहियले
जाणा हेची मनोमन

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...