गालगा गालगा गालगा गालगा
बैसता बोलता वंदितो श्रीहरी
आवडीने तुला स्मरतो श्रीहरी
सर्वदा राहते आस ती अंतरी
भक्तीने पूजता भेटतो श्रीहरी
कांडिले दळण ते भक्ताचे जाणिता
दृढ विश्वास पाहतो श्रीहरी
भान विसरून जाई जनाई तिचे
सत्कर्मे देव तो पावतो श्रीहरी
भक्तिच्या भावना जागता अंतरी
देव मदतीस धावतो श्रीहरी
====================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा