मुक्तछंद काव्य लिखाण स्पर्धा
४ वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय.. मुक्त छंदा वरील प्रवास
*मुक्तछंद काव्यलेखन*
साहित्याच्या दोन धारा
गद्य अन पद्य अमाप पसारा
नाटक ,कादंबरी ,लघुकथा
कविता, वा विनोदी वात्रटिका.
काव्यात आहेत प्रकार अनेक
मुक्तछंद हा प्रकार अभिनव एक
जरी नसते यमक साधणे
गेयते कडे मात्र लक्ष हवे.
मना मनातले भाव सहजची
उतरती लेखणीतून मुक्तछंदात
छंद,वृत्त , कोट्या ,समास
या शृंगाराचा साज दिसे काव्यात
वीर , करूणा , भय अन हास्य
असते सुंदर ललित काव्य
या सा-या नव रसाने युक्त
वाहताती मुक्तछंदी काव्यातून
*मुक्तछंद वरील प्रवास*
भासे जरी सरळ सोपा
शब्दांचा जुळवावा लागे मेळ
तेव्हा उमजती भाव योग्य स्वरूपात
मग देती दाद वाचक तयास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा