हवी मर्यादा जीवनी
वागण्यात बोलण्यात
आणावी ती अंमलात
सुखी होतो जीवनात
रोजच्या जीवनाला
लावा वळण मर्यादेचे
म्हणजे जगण होते
सदोदित नियोजनाचे
नदीला असतो काठ
सागरास तो किनारा
त्यामुळे वसतात नगर
मिळे मानवास निवारा
दिसे मर्यादा निसर्गात
म्हणूनच चाले ऋतुचक्र
जरा होता तो असमतोल
निसर्गाची होते दृष्टी वक्र
अशी महती मर्यादेची
जीवनात ठेवा ध्यानात
ओलांडता रेष सीतेने
घडले रामायण क्षणात
वैशाली वर्तक
कुंपण असते रक्षक
धुसणखोरीस घालते आळा
जणु अबोलतेने सांगते
आपापली मर्यादा पाळा.
वाचण्यास गुरांपासून
कुंपण हवे शेताला
सीमा पण आपोआप
जाण देते मनाला
रोजच्या जीवनाला
लावा वळण मर्यादेचे
म्हणजे जगण होते
सदोदित नियोजनाचे
संस्कार व संस्कृतीचे
पाळावे जीवनी बंधन
उज्वल भवितव्य घडण्या
कामास येई कुंपण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा