गुरुवार, १३ मे, २०२१

पिंजरा

माझी  लेखणी
विषय -- पिंजरा

कोणासही न आवडे
रहाणे ते बंदिस्तात
का ठेवावे डांबवून
मुक पशू पक्षास  पिंज -यात       1

स्वच्छंदाने वाटे जगावे
पशू पक्षी प्राणी मात्रांस
घेत उंच भरारी उडावे 
नका अडकवू कोणाही जीवास     2

 पहा सघ्या मानवास
अडकविले घराच्या पिंज-यांत
पक्षी मस्त  उडती नभी
उंच भरारी घेत गगनात                 3

आता तरी सुधर मानवा
नको ठेवू स्वानंदासाठी  
मुक जीवांना पिंज-यात
उडूदे त्यांना स्वच्छंदासाठी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...